Save template, Then Step 2: Install it Go to 'Layout' tab, select 'add a gadget', Select 'html/javascript' than copy and paste the following codes in content box- शारीरिक शिक्षण विभाग: आरोग्य शिक्षण

जागतीक महिला दिनाचे निमित्त साधून दिनांक 10/03/2017 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व मुंबई फुटबॉल असो.यांच्या संयुक्त उपक्रमाने परळ विभागातील मनपा शाळेतील मुलींचे फुटबॉल सामने संपन्न झाले.या प्रसंगी सन्मा.उपमहापौर श्रीमती हेमांगी वरळीकर व सन्मा.शिक्षणाधीकारी श्री.महेश पालकर तसेच Mcgm Sport Development Program चे CEO श्री. दिनेश नायर,शारीरिक शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य शिक्षण

भोजनातील हानिकारक संयोग
दुधा सोबत : दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत हानिकारक आहेत.
दह्या सोबत : खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.
तुपा सोबत : थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.
मधा सोबत : मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.
फणसा नंतर : पान खाणे हानिकारक असते.
मुळ्या सोबत : गुळ खाणे नुकसानदायक असते.
खीरी सोबत : खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.
गरम पाण्याबरोबर : मध घेऊ नये
थंड पाण्याबरोबर : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन घेऊ नये.
कलिंगडा बरोबर : पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.
चहा सोबत : काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.
माशा सोबत : दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.
मांस बरोबर : मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.
गरम जेवणा बरोबर : थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.
खरबुजा बरोबर : लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसानकारक असते.
तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. अ‍ॅल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.


तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात.




                      आरोग्यासाठी व्यायाम आणि खेळ


व्यायाम म्हणजे आपल्या डोळयासमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोचपण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहितच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारताताल्या जातिव्यवस्थेमुळे कष्टकरी वर्गाला अन्न कमी तर खाणा-यांना श्रमच नाही अशी परिस्थिती आहे. धट्टीकट्टी गरिबी म्हणण्याची आपल्यावर पाळी आहे. म्हणूनच व्यायामाचे महत्त्व आहे. व्यायाम केला नाही तर खालील दुष्परिणाम होतात.
एकूण शारीरिक क्षमतासहनशक्ती कमी होते. अपेक्षित आयुष्य कमी राहते.
- हृदय लवकर जीर्णदुबळे होणे.
- सांधे आखडणे आणि स्नायू दुबळे होणे. या आरोग्य समस्या लवकर उत्पन्न होणे.
- रक्तातली साखर वाढून मधुमेह होणे.
- शरीरात चरबी साठणेपोट सुटणेशुध्द रक्तवाहिन्यांत चरबीचे थर साठणेत्यामुळे रक्तवाहिन्यांत अडथळे होणे.
- भूक व पचनशक्ती मंद होणे.
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील . या सर्व हळूहळू वाढणा-या समस्या असल्याने त्यांची मनुष्याला सवय होऊन जाते. व्यायाम न करणेही अंगवळणी पडते. अनेकजण या आळसाचे समर्थन करतात. व्यायामाची आवड लहानपणापासूनच लावली पाहिजे. प्रत्येकाने काही ना काही व्यायाम आयुष्यभर नियमित करायला पाहिजे.
व्यायाम म्हणजे नेमके काय हेही समजायला पाहिजे. केवळ थोडेफार चालणे यालाच अनेकजण व्यायाम समजतात. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. सर्व दृष्टीने फायदेशीर होईल असे व्यायाम शोधून ते चिकाटीने नियमित करणे आवश्यक आहे. व्यायामाचे शास्त्र नीट समजावून घेण्यासाठी हे प्रकरण उपयोगी पडेल.

2 comments:

  1. Congratulation to all blog makers, officers,Teachers n all co-oprative staff bcz it is very imp information.
    Thanks!!

    ReplyDelete